शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे इच्छापूर्ती श्री साईबाबा पादुका पालखी सोहळा समिती शिरूर यांच्या वतीने श्री साईबाबा पालखी भंडारा, महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम दि ,11/08/2024 रोजी आयोजित करण्यात आला होता .
यावेळी हजारोंच्या संख्येने साई भक्तांनी महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला.
इच्छापूर्ती श्री साईबाबा पादुका पालखी गुरुपौर्णिमेनिमित्त शिरूर ते शिर्डी पायी पालखी जात असते.
गेल्या दोन वर्षापासून शिरूर ते शिर्डी पायी पालखी सोहळा सुरू करण्यात आला आहे.
शिरूर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्यात मोठया प्रमाणावर साई भक्त सहभागी होतात, हे गेलेले साईभक्त परत आल्यानंतर शिरूर येथे श्री साई भंडारा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
यावेळी दिनांक ११ ऑगस्ट रोजी श्री साई भंडारा चे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ११ वाजता दादाभाऊ लोखंडे व त्यांची पत्नी नगरसेविका रेश्मा लोखंडे यांच्या हस्ते श्री साई पादुका चा अभिषेक करण्यात आला.
तसेच जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा शिरूर हवेली भाजपा विधानसभा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली, तसेच उपस्थित सर्व साई भक्तांच्या हस्ते ही आरती करण्यात आली.
प्रदीप कंद यांनी या सोहळ्याला भेट दिल्यानंतर सर्व साई भक्तांना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी शुभेच्छा देताना म्हणाले की, इच्छापूर्ती पालखी सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे व त्यांचे सहकारी यांनी शिरूर तालुक्यातून हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे .जसे साईबाबांचे वचन आहे “सबका मालिक एक” त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक पहावयास मिळत आहेत.गेल्या दोन वर्षापासून मी या कार्यक्रमास येत आहे ,हे मी माझे भाग्य समजतो , जसे या समितीचे नाव आहे इच्छापूर्ती त्याप्रमाणे श्री साईबाबा भक्तांची मनातील इच्छा पूर्ण करो ही साईबाबा चरणी प्रार्थना त्यांनी केली.यावेळी त्यांचा सत्कार श्री साईबाबा इच्छापूर्ती समिती सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे, इच्छापूर्ती सोहळा समिती अध्यक्ष स्वप्निल रणदिवे, उपाध्यक्ष तुषार भवाळ, कार्याध्यक्ष विशाल जोगदंड, सचिव रमेश जाधव, कोषाध्यक्ष रामभाऊ इंगळे, सोमनाथ घावटे,कल्याणी हॉटेल उद्योग समुहाचे सर्वेसर्वा शरद पवार या सर्वांनी मिळून केला .
श्री साईबाबा इच्छापूर्ती समिती सोहळ्यांची सर्व पदाधिकारी एक उत्तम कार्य करत आहेत पुढील वर्षापासून माझेही श्री साईबाबा इच्छापूर्ती भंडारा कार्यक्रमांमध्ये योगदान करू अशा भावना अनेक भाविकांनी यावेळी व्यक्त केल्या.
शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष (अजितदादा गट) संतोष शितोळे, शहराध्यक्ष शरद कालेवार, मनसे शिरूर तालुका अध्यक्ष आदित्य मैड, मनसे शिरूर तालुका सचिव रवी लेंडे, यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन च्या सचिव नम्रता गवारे,महिला शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिरूर शहराध्यक्षा गीताराणी आढाव, शिरूर लोकसभा सोशल मीडिया सेलचे राजुद्दीन सय्यद, राष्ट्रवादीच्या नेत्या राणीताई कर्डिले, ॲड.अमृता खेडकर , तुषार भदाने,युवा नेता सनी जाधव, भाजपा चे विजय नरके,पत्रकार शोभा परदेशी, रूपाली खिल्लारी,अभिजित आंबेकर, मुकुंद ढोबळे, फिरोज शिकलकर, सुदर्शन दरेकर, फैजल पठाण इत्यादी मान्यवर तसेच असंख्य साईभक्त यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
श्री साई पालखी भंडारा यशस्वी करण्यासाठीं संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे, अध्यक्ष स्वप्निल रणदिवे, उपाध्यक्ष तुषार भावाळ,कार्याध्यक्ष विशाल जोगदंड, सचिव रमेश जाधव, कोषाध्यक्ष रामभाऊ इंगळे, संयोजक संदेश रासकर,विजय गव्हाणे,राजेश सोनवणे,सचिन वाले,ऋषिकेश ससाने,पवन सोनवणे,रामभाऊ लोंढे, वैभव सोनवणे,किसन पवार,वैभव साठे,पंकज भगत,विजय गायकवाड,गणेश कचरे,साई सोनवणे,शुभम गुंड, स्वप्निल कोरे,दीपक सकट,प्रमोद शेंडगे,ऋतिक करडे,हिरामण वळू या साई सेवकांनी परिश्रम घेतले.

