शिरूर प्रतिनिधी:
दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर शहर प्रखंडाच्या वतीने जखमी अवस्थेत असलेल्या देशी गोवंशाला जीवदान देण्यात आले.
शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये कोर्टाजवळ देशी गोवंश जखमी अवस्थेत तीन दिवसापासून पडून असलेली माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांद्वारे मिळाली असता त्या गोवंशाला वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासन व वैद्यकीय प्रशासन यांच्याशी संपर्क करून गोवंश पांजरपोळ येथे सुखरुप सोडण्यात आला.
राजेश भुजबळ हे त्या गोवंशाचा तीन दिवस उपचार करत होते. शासकिय डॅाक्टरांना संपर्क करुनही मदत मिळत नसल्याने ,त्यांनी शासकिय डॅाक्टरांना जाब देखील विचारला की , उपचार जमत नसेल तर लेखी द्या म्हणुन. पण काहीच उतर मिळाले नाही.
यानंतर बजरंग दलाच्या गोरक्षकांना संपर्क करुन माहिती दिल्यावर ,विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व वकील बांधवांच्या वतीने स्वखर्चाने या जखमी गोवंशावर योग्य तो वैद्यकीय उपचार करण्यात आले.
नंतर शिरूर येथील श्री गोरक्षण पांजरपोळ संस्था शिरुर गोशाळेत त्याला सुखरूप पणे सोडण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारू, शिरूर शहर प्रखंड संयोजक सुनील इंदुलकर ,बजरंग दल सह गोरक्षा प्रमुख
प्रतीक शर्मा आणि ऐडवोकेट शिवाजी वरपे, वेदांत दसरे, कुणाल गायकवाड, प्रणव घाडगे,व इतर पदाधिकारी व बजरंगी उपस्थित होते.
या सर्व कार्यात महेश बोरा यांनी वाहतुकीसाठीचा खर्च, तर वैद्यकीय उपचार डॉक्टर अतुल खेतमालक यांनी केला. तसेच शिरूर पांजरपोळ यांचे सहकार्य लाभले.
संबंधित कारवाईबाबत विश्व हिंदू परिषद शिरूर शहर प्रखंडाचा स्थानिक जनतेने आभार मानून त्यांच्या या सेवाकार्याचा कौतुक करण्यात आले.






Users Today : 4
Users Yesterday : 9