पुण्याच्या गणेशोत्सवात लोकसहभाग वाढविणे गरजेचे

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी: सागर पवार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ पुणे शहर महापालिका क्षेत्र परितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला.

पुणे शहर विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली.

मला आजही आठवतंय. हा पुरस्कार माझ्या मंडळाला मिळाला, तेव्हा याच रांगेत मीही उभा होता. लॅमिनेशन करुनच मिळणारं ते सर्टिफिकेट आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण एकेकाळी माझ्या मंडळाचा पुरस्कार घेण्यासाठी आलेलो मी आज याच पुरस्कारांचं वितरण करत होतो, हा क्षण केवळ माझ्यासाठीच नाही तर गणेशोत्सव मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठीच आनंदाचा होता.

‘देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचे महत्व आहे. गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे. त्यामुळे त्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीने वाढेल, हे आपण पाहिले पाहिजे. आजमितीस उत्सवातील लोकसहभाग कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे उत्सवाला धार्मिक, मंगलमय आणि समाजहिताचे रुप देण्याचा प्रयत्न करुया, असे आवाहन यावेळी केले.

यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी महापौर अंकुशअण्णा काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, अण्णा माळवदकर, अजय खेडेकर यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हेमंत रासने यांनी प्रास्ताविक तर महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 7
Users Today : 15
Users Yesterday : 22