द युवा ग्रामीण पञकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी विजय कांबळे; तर तालुका कोषाध्यक्ष पदी प्रकाश गवळी

शिरुर प्रतिनिधी
कायम पञकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी व अन्याय ,अत्याचाराच्या विरोधात लढा उभारून पञकारांना न्याय देणारी ,तसेच आवाज उठविणारी संघटना म्हणजे द युवा ग्रामीण पञकार संघ .
या संघटनेच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी नागरगाव येथील विजय कांबळे यांची तर शिरूर तालुका उपाध्यक्षपदी सरदवाडी येथील भरत घावटे व सणसवाडी येथील विश्वनाथ घोडके यांची सर्वांनुमते नुकतीच निवड करण्यात आली .
न्हावरे येथे रविवार दि.१५ रोजी द युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी निवडीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती , संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या आदेशाने ,तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सहसचिव विवेकानंद फंड, द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष शौकत शेख, आनंदा बारवकर, शकील मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुक्याची कार्यकारणी निवड करण्यात आली ,यात तालुकाध्यक्ष विजय कांबळे,तालुका उपाध्यक्ष भरत घावटे,विश्वनाथ घोडके,तालुका सचिव साहेबराव चव्हाण तालुका कार्याध्यक्ष योगेश पाचंगे ,तालुका संपर्कप्रमुख चेतन पडवळ,तालुका सल्लागार नितीन मिसाळ,तालुका कोषाध्यक्ष प्रकाश गवळी,तालुका खजिनदार सुनील काटे,तालुका संघटक संतोष काळे,तालुका सरचिटणीस मच्छिंद्र काळे,कायदेविषयी सल्लागार ॲड.इन्नुस मनियार , प्रमुख कार्यकारी अधिकारी कांचन सोनवणे, अक्षय वेताळ सदस्य, पौलस गवई सदस्य .

Read more