सरदवाडीत भुरटया चोरांचे चोरीचे सत्र सुरूच…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :

शिरूर तालुक्यातील सरदवाडी , येथे पुन्हा एकदा चोरांचा थैमान दिसून येत आहे.

 

सरदवाडी गावामधे कही दिवसा पूर्वी शेतकऱ्यांच्या विहिरि वरच्या केबलवायर चोरी झालेल्या होत्या, ते प्रकरण शांत होत नाही तेच आता चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे व बंद घरे लुटण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

रात्रि 12 ते 4 दरम्यान सरदवाडी गावात चोर ठीक ठिकाणी चोऱ्या करत आहे अशी चर्चा गावात होत आहे.

 

विशेष म्हणजे ग्रामपंचायत ने बसवलेल्या light बंद करुण चोरीचा प्रयन्त करत आहे असे दिसून येत आहे. याचा अर्थ चोर जाणकार आहे का? अशी ही चर्चा गावात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

दिनाकं 13 जून 2024 रोजी मध्यरात्रि हायवे लगत असणाऱ्या हॉटेल वर चोरी करण्याचा प्रयन्त झाला . तर

बंद घरे फोडने ह्यावर चोरांचा जास्त जोर आहे असे दिसून येत आहे.

सध्या भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरू असून यातून भविष्यात गंभीर प्रकारचे स्वरुप येण्यास वेळ लागणार नाही, अशी ही नागरिकांमध्ये चर्चा आहे.

विशेष असे की दिनांक 13 रोजी, सरदवाडी गावात रात्रि 3 4 ठिकाणी चोरीचा प्रयन्त केलेला असे आढळून आले आहे व असे असताना कुणी ही लेखी तक्रार न देता किंव्हा पोलीस प्रशासनास न सांगता, नेमकी काय वाट पाहत आहेत? यात सरदवाडी ग्रामपंचायत सुद्धा शांत आहे, हे विशेष.

यामुळे सध्या गावामधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावर त्वरित काही ,उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थानकडून होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 6
Users Today : 0
Users Yesterday : 9