कोरेगाव भिमा प्रतिनिधी:(विनायक साबळे)
पेरणे फाटा येथील झोपडपट्टी परिसरातील कचरा नित्य रोजपणे जाळण्यात येत असल्याने यातून निघणारा धूर कोरेगाव भिमा व भिमा नदीच्या पुलावर येत असल्याने या कोरेगाव भिमातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला असून ,कोरेगाव भीमाचे कारभारी यावर आवाज उठविणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील काही वर्षांपासून पेरणे फाटा येथील भिमा नदीला लागून असलेल्या भागात कचरा टाकण्यात येतो. या भागात कोरेगाव भिमा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील आहेत.
या कचऱ्याचे कोणत्याही प्रकारे विभाजन न करता तो थेट जाळण्याचा प्रकार राजरोसपणे सायंकाळच्या सुमारास घडत असतो. यामुळे कोरेगाव भिमा येथील नागरिकांना खोकला, श्वसनाचे आजार मागे लागले आहेत.
या कचऱ्याचा सर्वात जास्त त्रास नदी लगतच्या भागातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे गावचे कारभारी किमान या गंभीर प्रश्नाकडे पाहतील असा आशावाद ग्रामस्थ व्यक्त करत आहे.






Users Today : 0
Users Yesterday : 9