शिरुर प्रतिनिधी:
पैसा व पदापुढे सर्व अधिकारी पिंगा तर धरत नाही ना? असा नुकताच प्रकार शिरूर पोलीस स्टेशनला पाहण्यास मिळाला आहे.
शिरूर पोलिस स्टशनमध्ये फिर्याद देण्यास कुणी आले की, अन्याय काय झाला, आपेक्षा तो कोण आहे गरीब की श्रीमंत व तो सांगत असणारा कोण आहे, हे पाहिले जाणे व मग वाटले तर गुन्हा दाखल केला जातो, नाही तर परत या पाहू, थांबा थोडा वेळ, कुणावर आरोप करता माहीत आहे का? असे अनेक प्रश्न विचारून फिर्यदीला आरोपी असल्याची जाणीव करून दिली जाते, त्यामूळे काही जण शांत बसतात तर काही जण अन्याय सहन करत बसतात.
रामलिंग रोड येथील सुमन सखाराम साळवे या महिलेला मारहाणीचा व तिच्या मुलाला दिलेल्या धमकी बाबत तक्रार नोदविण्यासाठी शिरूर पोलिस स्टशनमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना दोन महिने लागत असतील तर कायदा कुणासाठी आहे,हे उघड होतें. अन्याय झालेल्या महिलेला जर न्याय मिळवन्यासाठी रॉकेल अंगावर ओतावे लागत असेल तर शिरूर पोलिस स्टेशन मध्ये काय चालत असेल, हे सांगावे लागणार नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिरूर तालुक्यात व शहरात अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत, ते अगदी लहान मुलांनी शास्त्रे बाळगणे, दारू भट्या, गुटखा विक्री असे व इतर अनेक बेकायदेशीर कामे जोमात सुरू आहेत .
शिरूर तालुक्यातील खाजगी शाळेत जर शिक्षक व प्रिन्सिपल दारू पिऊन डी जे वर नाचत असतील तर अशा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार घडत असणार?
अशा खाजगी शाळेत पालक वर्षाला हजारो रुपये फी भरत असतो, ती हि वेळेत नाही दिली तर? त्या पालकाला माहिती काय काय सहन करावे लागते. ते प्रिन्सिपल व शिक्षक यांना दारू पिण्यासाठी असेल, तर
अशा शाळांची परवानगी रद्द होणे गरजेचे आहे. अशा प्रिन्सिपल व शिक्षकांना सेवेतून निलंबित करून, परत कोणत्याही शाळेत काम करता येणार नाही, अशी शिक्षा होणे गरजेचे आहे.
नाहीतर काही दिवसात हा सर्व प्रकार प्रत्येक खाजगी शाळेत होण्यास वेळ लागणार नाही. कारण सरकारी शाळेपेक्षा किती तरी पटीने खाजगी शाळा फी घेतात व त्याचा उपयोग असा केला जात असेल तर, अशा खाजगी शाळा बंद होणे गरजेचे आहे, ते ही मुलांच्या भविष्यासाठी. कारण शिक्षक व प्रिन्सिपल असे रात्री पिऊन डी जे लाऊन नाचत असतील व ते ही शाळेत तर अशा शाळेत शिकत असणारा विद्यार्थी कसा घडत असेल?
शिरूर पोलिस प्रशासन असेच राहिले तर बदलापूर सारख्या घटना घडण्यास वेळ लागणार नाही? असाच आगळा वेगळा गुन्हा दि.22 /08/2024 रोजी घडला असल्याची चर्चा आहे, वेळेत पालकानी हालचाल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला.
